गावाविषयी माहिती
बिलोशी हे गाव महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील प्रगतशील व औद्योगिक गाव आहे.गावात गणपती मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २७९७ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2, अंगणवाडी केंद्रे ५ ,उपकेंद्र १ अशी शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात व इतर कडधान्य ही पिके घेतली जातात. पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बिलोशी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.